ई-छावणी बद्दल

ई-छावणी हे 62 छावणी परिषदांचे एक एकत्रित पोर्टल आहे ज्‍यायोगे नागरिकांना त्यांच्या छावणी परिषदेविषयी माहिती उपलब्ध आहे आणि त्यांना त्यांच्या छावणी परिषदेच्‍या दैनंदिन कामकाजाची माहिती आहे.

ई-छावणी पोर्टलचा वापर करून नागरिक संबंधित छावणी परिषदेने देऊ केलेल्या सर्व नागरी सेवांचा लाभ घेऊ शकतात. ई-छावणीचा उद्देश छावणी परिषदेच्‍या कर्मचा-यांना पारदर्शकतेने आणि प्रभावी पद्धतीने जनतेच्या गरजा चांगल्या प्रकारे सुसज्ज, जागरूक आणि उत्तरदायी बनविताना छावणी परिषदेशी नागरिकांचे संवाद सुधारणे हा आहे.

छावणी परिषदेच्‍या वेबसाइटवर छावणी परिषदे द्वारे देण्यात येणा-या विविध सेवांचा लाभ ई-छावणी नागरिकांना देते. नागरिकांना सध्या देण्यात येणा-या प्रमुख सेवांमध्ये माहिती पोर्टल, व्यापार परवाना, सार्वजनिक तक्रारी, ऑनलाईन चलन पेमेंट प्रणाली, भाडेपट्टा (लीज) नूतनीकरण, जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, पाणी व मलनि:सारण सुविधा समाविष्‍ट आहेत. छावणी परिषदे द्वारे पुरविल्‍या जाणा-या अन्य नागरी सेवांचा क्रमश: ऑनलाईन मालमत्ता कर भरणा सुविधा, ऑनलाईन इमारत योजना मान्यता सुविधा, सामुदायिक हॉल बुकिंग सुविधा, हॉस्पिटल ओपीडी नोंदणी सुविधा, शाळा प्रवेश आणि फी भरणे नजीकच्या भविष्यकाळात या सेवांचा ई-छावणी मध्‍ये समाविष्‍ट करून विस्तार करण्यात येईल.

सर्व
मध्‍य कमांड
दक्षिणी कमांड
पश्चिमी कमांड
उत्‍तरी कमांड
पूर्वी कमांड